तुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम

रात्री लवकर झोपणं शरीरासाठी फायदेशीर असतं . पण रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना लवकर झोपायला मिळत नाही.

रोज रात्री लवकर झोपल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य तर चांगले राहते पण त्याच बरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.

अभ्यासातून असे समोर आले आहे की, जर तुम्ही रात्री लवकर झोपत असाल तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहता तर रात्री उशिरा झोपल्याने तुम्हाला निद्रानाश, नैराश्य आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, रात्री 10 ते 11 च्या दरम्यान झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रात्री 10 वाजता झोपल्याने तुम्हाला गाढ झोप लागते आणि 8 ते 9 तास आरामात झोप होते.

एका अभ्यासानुसार असे समोर आले की जर तुम्ही रात्री योग्य झोप न घेतल्यास तुम्हाला उच्चरक्तदाब , हृदयविकार आणि मधुमेहाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रात्री 10 वाजता झोपल्याने शरीराची सर्कॅडियन रिदम राखण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हार्मोन्सदेखील निरोगी राहतात.

VIEW ALL

Read Next Story