आपण बऱ्याचवेळा त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी शरीरात कोलोजनची मात्रा नियंत्रीत हवी असं ऐकतो. हेल्दी आणि ग्लॉइंग स्किनसाठी मोठ्मोठ्या स्किनकेअर कंपन्या आणि सोशल मिडीया इंफ्ल्यूएंसर्स कोलोजनचा प्रचार करतांना दिसतात.
कोलोजन शरीरात आढळणारे प्रोटीन आहे ज्यामुळे आपल्या हडं, त्वचा केसांसाठी आवशक मानलं जातं. याशिवाय कोलोजन शरीराला ताकद मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं.
कोलेजन प्रोटीन शरीराला निरोगी बनवण्यासाठी आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. कोलेजन सांधेदुखीपासून मुक्त होण्यास आणि स्नायूंना बळकट करण्यास देखील फायदेशीर ठरतं.
शरीरात योग्य प्रमाणात कोलेजन असल्यामुळे त्वचा तरूण तर होतेच शिवाय चमकदारही राहते. त्वचा कोमल बनवण्यासाठी कोलेजन महत्वाचे आहे.
आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे, हे प्रोटीन त्वचेला सुरकुत्या आणि बारीक रेषांपासून संरक्षण देऊन कोमल आणि तरुण ठेवते.
कोलेजन केसांची रचना आणि आरोग्यासाठी योगदान देतं त्याच्यामुळे तुमच्या केसांची जाडी सुधारू शकते आणि केस मजबूत कोलोजनमुळे केस तुटणे आणि नुकसान टाळण्यास मदत होते. तसेच केस गळणे आणि केस गळणे टाळण्यास मदत होते.
कोलेजन निरोगी नखांना वाढीसाठी देखील प्रोत्साहन देते आणि तुमची नखे अधिक मजबूत बनवत.