अश्लील हावभाव केल्याने रोनाल्डोवर बंदी, मेस्सीचं नाव ऐकून भडकला

Published by: Zee Team | Feb 29, 2024

साऊदी प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत अल नासर संघाकडून खेळताना रोनाल्डोने अश्लील हावभाव केले. यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Feb 29, 2024

रोनाल्डोच्या अल नासर संघाने अल शबाब संघाला 3-2 असं पराभूत केलं. सामन्यानंतर रोनाल्डोने अल शबाबच्या समर्थकांसमोर अश्लील हावभाव केले.

Published by: Zee Team | Feb 29, 2024

सामन्यावेळी अल शबाब संघाचे समर्थक अर्जेंटिनचा दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सीच्या नावाने मेस्सी-मेस्सी नारे देत होते.

Published by: Zee Team | Feb 29, 2024

रोनाल्डोने केलेल्या कृत्याची साऊदी अरब फुटबॉल महासंघाने गंभीर दखल घेत त्याच्या निलंबनाची घोषणा केली. अल नासर संघाचा पुढचा सामना अल हजम संघाशी होणार आहे.

Published by: Zee Team | Feb 29, 2024

रीयल माद्रीद आणि मॅंचेस्टर यूनायटेडचा माजी स्टार रोनाल्डोला पाच हजार डॉलर अल शबाब आणि महासंघाला द्यावे लागणार आहेत.

Published by: Zee Team | Feb 29, 2024

विशेष म्हणजे रोनाल्डोला किंवा त्याच्या अल नासर संघाला महासंघाच्या निर्णयाविरोधात अपील करता येणार नाही. रोनाल्डोला एक सामन्याच्या बंदीचं पालन करावं लागणार आहे.

Published by: Zee Team | Feb 29, 2024

VIEW ALL

Read Next Story