कोरफड लावल्यास त्वचा चमकदार होतो. पण तुम्हाला माहीती आहे का? कोरफड जेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरत नाही. कोणत्या प्रकारच्या त्वचेवर हे वापरू नये जाणून घेऊया.
पिंपल्स येणाऱ्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास त्वचा खराब होते. त्यामुळे जर तुम्हाला पिंपल प्रॉब्लेम अस्तील तर शक्यतो टाळावे.
कोरफडामधून येणारे एलो - लॅटेक्स हा पदार्थ त्वचेसाठी हानिकारक ठरू शक्तो. याचा वापर चेहऱ्यावर झाल्यास त्यावरील रॅशेस वाढू शकतात.
गरोदरपणामध्ये असताना कोरफड जेल लावल्यास चेहऱ्यावर खाज, रॅशेस येण्याची शक्यता अस्ते त्यामुळे अशावेळी शक्यतो कोरफड जेल लावण टाळा.
ज्या लोकांची कॉस्मेटिक सर्जरी होते त्या लोकांनी कोरफड जेल लावणं टाळावं कारण सर्जरीमुळे त्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील होते
ताज्या करफडाचं जेल लावायचं असेल तर पान कापून काही वेळ तसाच ठेवा त्यातील एलो लॅटेक्स हा विषारी पदार्थ निघून जाईल. त्या नंतर तुम्ही जेलचा वापर तुमच्या चेहऱ्यावर करू शक्ता.
कोरफड जेलमध्ये हळद आणि गुलाबजल मिक्स करून चेहऱ्याला लावता येईल. हे संवेदानशाल त्वचेसाठी योग्य ठरते.
बाजारात मिळणारे कोरफड जेलचा वापर करयची असेल तर त्याआधी तुम्ही तुमच्या हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट लक्की करा.
कोणताही आजार किंवा समस्या असेल तर कोरफड जेलचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.