मुंबईचा फलंदाज सरफराज खानला अखेर भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं आहे. अनेक वेळा चांगली कामगिरी करूनही निवड समितीकडून सर्फराजकडे दुर्लक्ष केले जात होते.
सरफराज खान हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. त्याला टीम इंडियात संधी देण्यात यावी, अशी मागणी ही गेल्या कित्येक महिन्यांपासून करण्यात येत होती.
मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यातील प्लेईंग 11 मध्ये कर्णधार रोहित शर्माने सरफराजला संधी दिली नाही.
पुढच्या कसोटी सामन्यात गरज पडल्यास मैदानात उतरवणार असल्याची शक्यता रोहित शर्माने व्यक्त केली आहे.
सर्फराजने काही दिवसांआधीच इंग्लंड लायन्सविरुद्ध शतकी खेळी केली होती.
इंग्लंड लायन्सविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात सर्फराजने भारत-अ संघाकडून खेळताना 65 व 160 चेंडूंत 161 धावांची खेळी केली.
तसेच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 14 शतके आहेत.