आपल्या खास सुगंधाने जेवणाची लज्जत वाढवणारी वेलची आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
पित्ताशयात खडे असणाऱ्यांनी वेलची खाणे टाळावे.
किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी देखील वेलची खाऊ नये.
सुंगधाची विशिष्ट प्रकारची एलर्जी असणाऱ्यांनी देखील वेलचीचे सेवन टाळावे.
गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात वेलची खाल्ल्यास गर्भपाताची भिती असते.
जास्त प्रमाणात वेलची खाल्ल्यास उलटी, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होवू शकतात.
हृदयविकार किंवा अन्य आजारांमुळे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असलेल्यांनी वेलची खाऊ नये.