चांगली झोप येण्यासाठी हा चहा प्या

चहाचे फ्लेवर

चहा पिण्याची अनेकांना आवड असते. झोप घालवण्यासठी अनेक जण चहा पितात. पण असे काही चहाचे प्रकार आहेत ज्याने तुम्हाला आरामदायी नक्कीच वाटू शकतं.

कॅमोमाइल चहा

कॅमोमाइलच्या फुलांपासून हा चहा तयार केला जातो. हा चहा तुमच्या शरीराला आराम देतो.

बडिशेप चहा

बडीशेप अपचन, सूज कमी करण्यास आणि पचनशक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे असा चहा फायदेशीर ठरू शकतो.

अश्वगंधा चहा

अश्वगंधाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण अश्वगंधा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ताण कमी करण्यास मदत करते ज्यामुळे चांगली झोप लागते.

लॅव्हेंडर चहा

लॅव्हेंडर चहाचे सेवन केल्याने शारीरिक कमजोरी आणि मानसिक थकवा दूर होतो. लॅव्हेंडरचा सुगंध ताण कमी करतो आणि त्यामुळे चांगली झोप लागते.

ग्रीन टी

सकाळी ग्रीन टी प्यायल्याने रात्री चांगली झोप येते. सकाळी किंवा दुपारी एक किंवा दोन कप ग्रीन टी पिणे फायदेशीर आहे. पण रात्री झोपण्याच्या दोन तास आधी हे पिऊ नये. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story