दूध फाटल्यानंतर गृहिणींच्या मनाला चुटपूट लागून राहते. इतकं फेकून कसं द्यायचं असा प्रश्न पडतोय
फाटलेले दूध फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यापासून टेस्टी स्वीट डिश बनवू शकता. घरच्या घरीच स्वस्त आणि मस्त मिठाई लगेच बनवून होईल.
फाटलेले दूध- ३ कप, फ्रेश दूध- २ कप,साखर- ४ ते ५ चम्मच,तूप- २ चम्मच,वेलची पावडर, सजावटीसाठी काजू
फाटलेले दूध गरम करुन छान गाळून घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. त्यानंतर एका भांड्यात ताजे दूध उकळून घ्या.
ताजे दूध उकळून घेतल्यानंतर त्यात फाटलेल्या दूधाचा खवा मिसळून घ्या. त्यानंतर सतत हे मिश्रण ढवळून घ्या.
मिश्रण थोडे घट्ट झाल्यानंतर त्यात तूप. साखर, वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. त्यानंतर एका ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण टाकून पसरवून घ्या.
मिश्रण पसरवून घेतल्यानंतर त्यावर काजू आणि बदाम किसून घाला व काही तास सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.