वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. काही जणं खाणं कमी करतात. तर काहींच्या मते बाहेरचं खाणं बंद केल्याने वजन कमी होतं.
पण तुम्हाला माहित आहे का वजन कमी करण्यासाठी खाणं अचानक कमी केल्यास त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे योग्य डाएट महत्त्वाचं असतं.
पण एका आयटी इंजिनिअर तरुणाने आपलं वजन तर कमी केलंच पण बॉडीही कमावली. 15 महिन्यात या तरुणाने तब्बल 19 किलो वजन कमी केलं.
वजन कमी करण्याबरोबरच त्याने व्यायाम करत सीक्स पॅक अॅब बनवले. आता तो बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपधमध्ये भाग घ्यायला सुरुवात केलीय.
या आयटी इंजिनिअर तरुणाचं नाव आहे प्रणव सैनी. तो पटियाला इथं राहातो. नोकरीबरोबरच प्रणवने न्यूट्रीशियनचं शिक्षण घेतलं.
आता प्रणव लोकांना ट्रेनिंग देण्याचंही काम करतो. प्रणव दररोज एक तास व्यायाम करतो. तर 15 मिनिटं कार्डिओ करतो.
प्रणवने आपल्या डाएटचं रहस्यही सांगितलंय. सकाळी ओट्स आणि एग व्हाईटचा नाश्ता. लंचमध्ये सलाद आणि मटण बिर्याणी. संध्याकाळी फळं आणि प्रोटीन शेक तर डिनरमध्ये पुन्हा चिकन बिर्याणी तो खातो.