दीर्घायुष्यासाठी मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगलं राहणं गरजेचं असतं. यासाठी मायक्रो-मेडिटेशन चांगला पर्याय आहे. याकरिता काही सेकंदांचं मेडिटेशन आवश्यक आहे. यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल.
मायक्रो-मेडिटेशन तुम्ही कुठेही करु शकता. तुम्ही कुठेही बसून 0 ते 4 सेकंदासाठी श्वास आत बाहेर करा. यानंतर 4 ते 8 सेकंदासाठी श्वास रोखा आणि 8 ते 12 सेकंद बाहेर सोडा.
डॉक्टर कीन म्हणतात की, अनेक अभ्यासानुसार दीर्घायुष्यासाठी 5 मिनिटांचा व्यायामही फायदेशीर ठरतो.
दीर्घायुष्य हवं असेल तर तुम्ही तुमच्या झोपेची वेळ ठरवण्याची गरज आहे. काही झालं तरी झोपेची आणि सकाळी उठण्याची वेळ पाळा.
रिसर्चमधून समोर आलं आहे की, सोशल गॅदरिंगमुळे काही लोक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यात मदत होते. यामुळे फोनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा लोकांना भेटा.
तज्ज्ञांच्या मते, जर कोणी स्वत:वर प्रेम करत असेल तर ती व्यक्ती नेहमी आनंदी राहते.