शुभमन गिलच्या बॅटला 'ग्रहण', अजून किती मिळणार संधी?

Published by: Zee Team | Jan 26, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यात टेस्ट सामना सुरु असून टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

मात्र चाहत्यांना पुन्हा एकदा नाराज करून शुभमन 23 रन्सवर पव्हेलियन मध्ये परतला. त्यामुळे गिलचा फ्लॉप शो सुरुच असल्याचं दिसून येतंय.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

24 वर्षीय शुभमन गिल टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्याच दिवसांपासून 'आउट ऑफ फॉर्म' आहे.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलपासून गिलने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही गिलची बॅट शांत होती. त्यावेळी त्याने 4 डावांत केवळ 74 रन्स केले होते.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

टेस्ट क्रिकेटमध्ये शुभमन गिलकडून खूप अपेक्षा आहेत, पण सध्याची त्याची खेळी पाहता तो टीम मॅनेजमेंटसाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

VIEW ALL

Read Next Story