शरिरासाठी काळे तीळ खुप फायदेशीर आहेत. यामधल्या औषधी गुणांमुळे अनेक आजार पळून जातात.
तीळाचे लाडू हे थंडीच्या दिवसात शरिरीसाठी उत्तम मानले जातात. जाणुन घेऊया काळे तीळ खाण्याचे फायदे.
काळे तीळ जर तुम्ही दररोज खाल तर तुमची केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते. केस पांढरे होत असल्यास हे तीळ खाऊ शकतो.
जर तुम्हाला पोट बिघडण्याची समस्या असेल तर काळे तीळ खाऊ शकता.
पचनक्रिया सुरळीत ठेवून आपले आरोग्या उत्तम ठेवण्याचं काम काळे तीळ करतात.
काळे तीळ खाल्ल्यानं ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहते. यामध्ये मॅगनेशियमचे प्रमाण जास्त असते.
मजबूत हाडांसाठी काळे तीळ खाणं गरजेचं आहे. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.