आताच या सवयी सोडा नाहीतर....

दैनंदिन जीवनातील 'या' सवयी करतायत शरीर पोखरण्याचं काम; आताच सोडा नाहीतर....

पचनसंस्था बिघडते

हल्ली धकाधकीच्या जीवनात आपण जेवणाच्या वेळा सातत्यानं बदलत असतो. यामुळं पचनसंस्था बिघडते. परिणामी पित्त, पोटाचे विकार, अपचन अशा अडचणी उदभवतात

मधुमेह

जेवणाच्या अनियमित वेळांमुळं वजन वाढतं. ज्यामुळं स्थुलता, मधुमेह यांसारख्या गंभीर व्याधीही ओढावतात.

मोबाईलचा वापर

सतत मोबाईलचा वापर करणं थांबवा असं सांगूनही आजची पिढी याकडे लक्ष देत नाही. पण नकळत यामुळं आपण आपली इंद्रिय निकामी करत आहोत.

नजर कमकुवत होते

मोबाईलच्या वापरामुळं नजर कमकुवत होते. याशिवाय पाठ आणि मानदुखीही उदभवते. इतकंच काय, तर मोबाईल रेडिएशनमुळं मेंदूवरही विपरित परिणाम होतो.

लहानसहान गोष्टींचा ताण

सततच्या धावपळीमध्ये कळत नकळत आपण लहानसहान गोष्टींचा ताण घेत असतो. पण, असं करण्यामुळं माानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

हृदयाचे ठोके

अती तणावामुळं हृदयाचे ठोके वाढणं, रक्तदाब नियंत्रणात न राहणं आणि कोर्टोसोलचा स्तर वाढणं अशा शारीरिक व्याधी बळावतात. मुख्य म्हणजे हदयविकारांचा धोका वाढतो.

कामाचा व्याप

कामाचा व्याप किंवा आणखी काही कारणांमुळं अनेकदा रात्री झोपण्याच्या वेळाच ठरलेल्या नसतात. अशा वेळी अपुरी झोप अनेक शारीरिक व्याधींना आमंत्रण देऊन जाते. शरीराची कार्यक्षमता कमी होण्यासोबतच तुमच्या बुद्धिवरही याच परिणाम होतात. त्यामुळं वाईट सवयी टाळा आणि शरीराचं आरोग्य संतुलित ठेवा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारलेली असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )

VIEW ALL

Read Next Story