200 मेगापिक्सचा कॅमेरा असलेल्या फोनवर 15 हजारांची सूट; पाहा किंमत

आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे

200 मेगापिक्सच्या फोनवर तब्बल 15 हजारांची सूट देण्यात आल्याचं वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. पाहा सविस्तर डिटेल्स, फिचर्स अन् सूटसहीत हा फोन कितीला मिळतोय त्याबद्दलचा तपशील...

सुवर्णसंधी

सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा फाइव्ह जी हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

15 हजारांची सूट

सॅमसंगच्या या दमदार फोनवर तब्बल 15 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

अधिकृत वेबसाईटवरुन सूट

विशेष म्हणजे सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर हा फोन एवढ्या सवलतीसहीत उपलब्ध आहे.

सर्वच गोष्टींवर सूट

सॅमसंगने त्यांच्या वेबसाईटवर 'फॅब ग्रॅब ऑफर' सुरु केली आहे. केवळ स्मार्टफोनच नाही तर वॉशिंग मशीन, फ्रिज, एसीवरही मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

स्क्रीनचे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा फाइव्ह जीची स्क्रीन 6.8 इंचांची आहे. यामध्ये क्वाड एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये डायनॅमिक्स अल्मोड 2 X तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.

कॅमेरा सेटअप कसा?

सॅमसंगचा हा मोबाईल क्वाड रेअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा आहे. सेकेंडरी कॅमेरा 10 मेगापिक्सल, तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल तर चौथा कॅमेरा 10 मेगापिक्सल आहे. फ्रण्ट कॅमेरा 12 मेगापिक्सचा आहे.

15 हजार रुपयांची सूट

'फॅब ग्रॅब ऑफर'मध्ये सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर 15 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. मात्र ही ऑफर कधीपर्यंत आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

सॅमसंग Amazon पेक्षाही स्वस्तात विकतोय फोन

Amazon च्या वेबसाईटवर सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा फाइव्ह जी हा फोन 1 लाख 21 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. पण...

नेमका कितीला मिळतोय हा फोन?

'फॅब ग्रॅब ऑफर'मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा फाइव्ह जी हा फोन 1 लाख 6 हजार 999 रुपयांना मिळत आहे.

फोनचं कॉन्फिगरेशन काय?

सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा फाइव्ह जीचा हा 1 लाख 7 हजार रुपयांचा फोन 12 जीबी रॅम, 256 जीबी इंटरनल स्टोरेजसहीत उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story