आपण खूप वर्षे जगावे असे प्रत्येकाला वाटते पण खराब लाईफस्टाईल आणि अनहेल्थी फूडमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे.
पण तुम्ही तुमच्या नेहमीच्या सवयी आणि खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष दिलात तर तुम्हीदेखील 100 वर्षे जगू शकता.
अमेरिक वैज्ञानिकांनी यामागचे गुपित सांगितले आहे. केवळ 2 एक्सरसाइज करुन शंभर वर्षे जगलेल्या अनेक व्यक्ती त्यांच्या माहितीत आहेत.
जे लोक स्वत:ची कामे स्वत: करतात ते जास्त आयुष्य जगतात. जसे की, शेतकरी, किंवा गायी-गुरे, बकरी पाळणारे किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणारे.
खूप पायऱ्या चढणे आणि हळू हळू वजन उचलणे हे दोन व्यायाम रोज करायला हवेत. यासोबतच रोज 30-30 मिनिट वेगाने चालण्याचा सल्ला दिला जातो.
आपले जीवन कसे जगतो? यावरच आपले आरोग्य आणि वय ठरते. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांचे आयुष्य झपाट्याने कमी होताना दिसत आहे.
पण आपण रोजच्या आयुष्यात काही गोष्टींकडे लक्ष दिले तर आयुष्य वाढवू शकतो.
निरोगी आयुष्यासाठी आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी लागेल. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहाल.
तुमच्या डाएटवर लक्ष द्या. तळलेले, मसालेदार पदार्थांपासून दूर राहा.