मेथीचे दाणे पाण्यात भिजवल्याने त्याचे फायबर वाढते आणि त्याचे गुणधर्मही वाढतात. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. मेथीचे दाणे रात्री भिजवून सकाळी सेवन केल्याने मधुमेहाची लक्षणे दूर होतात. यासोबतच केस आणि त्वचा देखील चमकते.
मनुका पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यामुळे फायबर देखील वाढते, ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता आणि मूळव्याध सारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
चन्यांमध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा येते आणि त्यामुळे थकवा दूर होण्यासही मदत होते.
अंजीरमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यात पॉलिफेनॉल आणि खनिजे असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करण्यात मदत करतात. पचनाच्या समस्येने त्रस्त असाल अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
बदामामध्ये कॅल्शियम, प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात आणि पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. यामुळे मेंदूचे विकार दूर होण्यास मदत होते. स्मरणशक्ती वाढते.
वजन कमी करण्यासाठी याची मदत होते. मधुमेह नियंत्रणात राहतो. सकाळी नश्ताच्या आधी याचे सेवन केल्यास दिवसभर थकवा येत नाही.