ड्रायफ्रूट खाणं कधीही उत्तम मानलं जातं. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॉपर, आयरन, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, नियासिन, थियामिन, फोलेट यासारखे पौष्टिक घटक आढळतात.
पण एका व्यक्तीने दिवसभरात किती बदाम खाले पाहिजेत, याची तुम्हाला माहिती आहे का?
जर तुम्ही दररोज बदाम खाण्याची सवय लावत असाल तर सुरुवातीला तुम्ही केवळ 2 बदाम पाण्यात भिजवून आणि त्याची साल काढून खा.
तुम्हाला ज्यावेळी 10 दिवस दोन बदाम खाण्यास सोयीस्कर वाटलं आणि पचनास कोणताही त्रास झाला नाही तर तुम्ही दिवसाला 5 बदाम खाणे सुरु करू शकता.
5 भिजवलेले आणि सोललेले बदाम जर तुम्ही सलग 21 दिवस खात असाल आणि तुम्हाला पोट फुगणं, जुलाब किंवा पचनाशी संबंधित कोणत्याही समस्या जाणवल्या नाही तर दररोज बदाम खाण्याची संख्या 10 पर्यंत वाढवण्यास हरकत नाही.
तीन महिने जर तुम्ही रोज 10 बदाम खात असाल तर यानंतर तुम्ही हे प्रमाण 12, 15, 18 ते 20 बदाम खाण्यापर्यंत वाढवू शकता.
ज्या लोकांची पचनशक्ती चांगली आहे, जे रोज व्यायाम करतात अशा व्यक्ती दररोज 20 बदाम खाऊ शकतात.