बसून काम करणाऱ्यांचेही वजन होईल कमी, आहारातून काढून टाका या 2 गोष्टी

सध्याची जीवनशैली आणि काम करण्याची पद्धत यामुळं वजन वाढत जाते. ऑफिसमध्ये सलग सात ते आठ तास बसून काम करावे लागते.


बैठे काम करण्याच्या पद्धतीमुळं पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते. वाढते वजन हे आरोग्यासाठी धोकादायक असते.


वजन कमी करण्यासाठी आणि पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी करण्यासाठी आहारातून या दोन गोष्टी कमी करा.


रोजच्या आहारातून तेलकट खाद्यपदार्थ काढून टाका किंवा कमी करा कारण या पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते.


अशावेळी जे लोक बैठे काम करतात त्यांच्या कॅलरीज बर्न होत नाहीत आणि चरबीमध्ये बदलू लागते त्यामुळं सकस आहारातून वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा


ऑफिससाठी निघताना शॉर्टकट ब्रेकफास्ट म्हणून चहा बिस्किटे खाणे पसंत करतात. तसंच, चिप्स आणि खारट बिस्कीटेदेखील आवडीने खातात.


तुमच्या आहारातून खारट पदार्थ कमी केल्यास कॅलरी काउंट वाढत नाही. तसंच, तुमचं वजनही नियंत्रणात राहते.

VIEW ALL

Read Next Story