पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घरातच दडलाय उपाय

रविवारी सकाळी नाश्त्याला गरमागरम इडल्या, चटणी आणि सांबार असल्यास अगदी भरपेट नाश्ता होतो. घरी पीठ भिजवून इडली केल्यास पुरवठ्यातही येतात आणि चवीलाही छान लागतात.

पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात इडलीचे पीठ नीट आंबत नाही. त्यामुळं इडल्या टम्म फुगत नाहीत. तसंच, खाताना मउदेखील लागत नाहीत.

पावसाळ्यात इडलीचे पीठ छान फुलण्यासाठी एक खास टिप्स वापरावी. याने अगदी वरपर्यंत पीठ फुलते आणि इडलीदेखील चवीला छान आणि मऊ लागते.

इडलीचे पीठ परफेक्ट भिजवण्यासाठी ही एक खास टिप्स वापरुन पाहा. डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजवून वेगवेगळे वाटून घ्या. दोन्हीही जाडे-भरडे न वाटता एकदम पातळ पेस्ट करा.

एका मोठ्या भांड्यात दोन्ही पीठ एकत्र करा त्यात चवीपुरते मीठ. 2 टीस्पून तिळाचं तेल. तिळाच्या तेलाने इडलीची चव छान लागते.

इडलीच्या पीठात इनो टाकून थोडासा लिंबाचा रस पिळा आणि इडलीचे पीठ व्यवस्थित ढवळून घ्या. इनोमुळं इडलीचे पीठ आंबण्याची प्रक्रिया जलद होते. इनो घातल्यानंतर 4 ते 6 तास झाकून ठेवा

जर तुम्हाला इनो आणि लिंबाचा रस टाकायचा नसेल तर तुम्ही घरातीलच एका वस्तूचा वापर करु शकता.

इडलीचे पीठ वाटून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 4 ते 6 तास झाकून ठेवा. पावसाळ्यात व हिवाळ्यात पीठाच्या भांड्याभोवती शाल किंवा स्टॉस टाकून ठेवा. जेणेकरुन पीठ चांगलं आंबलं जाईल.

VIEW ALL

Read Next Story