Chanakya Niti: हे गुण असणाऱ्यांवर प्रसन्न होते लक्ष्मी अन् 'या' लोकांकडे फिरवते पाठ

चाणक्य नीतिमध्ये श्रीमंत होण्यासंदर्भात काय म्हटलं आहे पाहूयात...

अनेक गोष्टी आजही लागू

आचार्य चाणक्य यांना जगातील महान अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी चाणक्य नीतिमध्ये नमूद केलेल्या अनेक गोष्टी आजही लागू पडतात.

मिळेल यश आणि समाधान

चाणक्य यांच्या नीतिचं पालन करुन व्यक्तीला सुख, समाधान आणि यशस्वी आयुष्याची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं जातं.

...तर मिळेल अधिक संपत्ती

चाणक्य नीतिमध्ये श्रीमंत होण्यासंदर्भातील उल्लेखही आहे. काही गोष्टींचं पालन केलं तर संपत्ती अधिक प्रमाणात मिळेल असं चाणक्य नीति सांगते.

कोणाकडे लक्ष्मी फिरवते पाठ अन् कोणावर होते प्रसन्न

लक्ष्मी कोणावर प्रसन्न होते आणि कोणाकडे पाठ फिरवते याबद्दलचा उल्लेखही चाणक्य नीतिमध्ये आहे. याचसंदर्भात चाणक्य नीतिमध्ये काय म्हटलं आहे पाहूयात...

जे इतरांना मदत करतात...

जे लोक कायम सकारात्मक विचार करतात, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करतात, त्यांना मदत करतात अशा लोकांवर लक्ष्मी प्रसन्न असते.

अशा लोकांना कामामध्ये फार यश मिळतं

सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या आयुष्यातील कष्ट लवकर संपतात. अशा लोकांना कामामध्ये फार यश मिळतं. त्यांना मोठ्याप्रमाणात धन आणि संपत्ती प्राप्त होते. या लोकांना आयुष्यात फार सुख मिळतं.

प्रमाणिकपणाच्या जोरावर संपत्ती

कोणाचीही फसवणूक न करता मेहनत आणि प्रमाणिकपणाच्या जोरावर संपत्ती कमवतात त्याच्यावरही लक्ष्मी प्रसन्न होते.

लक्ष्मी कायम प्रसन्न असते

आपल्या कमाईपैकी काही भाग दान-धर्मासाठी देणाऱ्यांवरही लक्ष्मी कायम प्रसन्न असते, असं चाणक्य नीति सांगते.

लक्ष्मीचा वरदहस्त

जे लोक समाजाच्या हितासंदर्भात विचार करतात, चांगली कामं करतात, इतरांसाठी आपली संपत्ती खर्च करतात त्याच्यावरही लक्ष्मीचा वरदहस्त असतो, असं चाणक्य नीति सांगते.

कुटुंब कायमच सुखी

हिताच्या कामांसाठी हात सैल सोडणाऱ्यांवर लक्ष्मी कायमच प्रसन्न असल्याने त्यांचं कुटुंब कायमच सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवन जगतं, असंही चाणक्य सांगतात.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

VIEW ALL

Read Next Story