तुम्हीसुद्धा चहा प्रेमी आहात? मग 'या' गोष्टींची काळजी नक्की घ्या

Published by: Zee Team | Mar 05, 2024

चहा बनवताना चांगल्या क्वॉलिटीची चहा पावडर वापरली पाहिजेल, लोकांना असं वाटत चहा जास्त उकळला तर त्याची चव छान लागते पण त्यामुळे चहाची चव कडू होते.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

चहामध्ये जर कच्च्या दुधाचा वापर केला तर त्याची चव बिघडते आणि याच्या सेवनामुळे अॅसिडिटी होते त्यामुळे शक्यतो कच्च्या दुधाचा वापर टाळावा.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

चहामध्ये दुध टाकल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर त्यात साखर घातली पाहिजे ज्यामुळे चहाला छान चव येते.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थता आणि थकवा येऊ शकतो. चहाच्या पानात आढळणारे कॅफिन शरीरातील अस्वस्थता आणि थकवा वाढवते.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

चहाच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात कॅफिनमुळे समस्या उद्भवू शकतात. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी चहा कमी प्यावा.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

चहाच्या पानांमध्ये काही घटक असतात ज्यामुळे मळमळ होऊ शकते. यामुळे तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटू शकते.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

दिवसातून अनेक वेळा चहा प्यायल्यानेही पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या तक्रारी होऊ शकतात.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

गर्भवती महिलांनी चहापासून दूर राहावे. हे त्यांच्यासाठी गंभीरपणे हानिकारक असू शकते.

Published by: Zee Team | Mar 05, 2024

VIEW ALL

Read Next Story