चष्म्यामुळं नाकावर आलेले काळे डाग कसे दूर कराल?
बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग तत्व असतात. त्यामुळं चष्म्याच्या जागी असणाऱ्या डागांवर बटाट्याची पेस्ट लावल्यास ते नाहीसे होतात.
कोरफडापासून तयार करण्यात आलेल्या अॅलोवेरा जेलचा वापरही नाकावरील डागांवर केला जाऊ शकतो. ज्यामुळं त्यांचा रंग फिका पडू लागतो.
लिंबू आणि पुदीन्याचा रस पाण्यात मिसळून ही पेस्ट चष्म्यामुळं पडलेल्या डागांवर लावल्यास त्यामुळं ते कमी होण्यास मदत होते.
काकडीचा वापर करूनही तुम्ही नाकावरील डाग दूर करू शकता.
संत्र्याच्या सालीला वाळवून त्यापासून तयार झालेली पेस्ट नाकावरील डागांवर लावल्यास चष्म्यामुळं आलेले डाग कमी होण्यास मदत होते.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)