रात्री झोप येत नाही, मग करा हे खास घरगुती उपाय

Feb 03,2024


रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सततच्या ताण तणावामुळे झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. निद्रानाशावर जाणून घेऊयात काही रामबाण उपाय


मानसिक तणाव हे झोप न होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे शक्य तितके प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.


रात्रीच्या जेवणात अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाल्याने पित्त वाढते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात सलाड, सूप किंवा पचनास हलके असलेले पदार्थ खावेत.


रात्री झोपायच्या तासभर आधी मोबाईल वापरणे टाळावे.


झोपेच्या समस्येवर जायफळ फायदेशीर ठरते. रात्री एक चमचाभर जायफळ पावडर एक ग्लास दुधातून प्यायल्याने निद्रानाश दूर होण्यास मदत होते.


रात्री झोपताना आपला बिछाना स्वच्छ असणे गरजेचे आहे.


झोपायच्या आधी डोक्याला तेलाने मसाज केल्याने मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे शांत झोप लागते.


झोपायच्या वेळी चहा , कॉफी यांसारख्या उत्तेजक पेयाचे सेवन करणे टाळावे.


झोप न येण्याची समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

VIEW ALL

Read Next Story