किडाजडी किंवा यार्सागुंबा एक औषधी वनस्पती आहे. जी डोंगराळ भागात सापडते.
ही औषधी वनस्पती मुख्यत: नेपाळ, तिबेट आणि उत्तराखंडच्या उंच डोंगराळ भागात सापडतात.
किडाजडी ही औषधी वनस्पती एक प्रकारची बुरशी आहे. जी अळ्यांच्या शरिरात उगते.
याला चीनी क्षेत्रातील पारंपारिक औषध मानले जाते.
ताकद वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा उपयोग होतो.
याला नैसर्गित वायग्रादेखील म्हटलं जातं. शारीरिक आरोग्यासाठीदेखील ही फायदेशीर आहे.
श्वसनाशी संबंधीत आजार, किडनीसंबंधी आजार आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
याची मागणी जास्त असल्याने किंमत जास्त आहे आणि ही वनस्पती दुर्लभदेखील आहे.
ही वनस्पती गोळ करणं कठीण होतं. त्यामुळे याचे दर सोन्यापेक्षाही जास्त असतात.