कुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट

स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे प्रेशर कुकर. कुकरमुळे गृहिणींच्या वेळीची बचत होते. तसंच, अन्नही पटकन शिजते. त्यामुळं किचनमध्ये हमखास कुकर असतो.

गॅसचीदेखील बचत

कुकरमुळे वेळेसोबतच गॅसचीदेखील बचत होते. घरी यायला उशीर झाला असेल तर गृहिणी पटकन डाळ-भाताचा कुकर लावतात. त्यामुळं आयत्यावेळी जेवणाची पटकन सोय होते. पण अनेकदा कुकरची नीट स्वच्छता केली जात नाही. त्यामुळं कुकर खराब होण्याची शक्यता निर्माण होते.

कुकरच्या झाकणावर पिवळा थर

कुकरमध्ये डाळ लावल्यास शिट्टीसोबतच डाळदेखील कुकरबाहेर येते आणि कुकरच्या झाकणावर पिवळा थर साचतो. मग हे किचकट डाग साफ करणे गृहिणींसाठी मोठे दिव्यच असते. अशावेळी डाळ बाहेर येऊ नये यासाठी या काही टिप्स

डाळ, भात बनवताना कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येत असेल तर हे टाळण्यासाठी एक चमचा तेल किंवा तूप डाळ भातात टाका. तसंच, प्रेशर कुकरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरु नये

रबरमधून हवा बाहेर

प्रेशर कुकरचे रबर सैल झालं असेल तरीही पाणी बाहेर येऊ शकते. अशावेळी थंड पाणी, गव्हाचं पीठ आणि टेपचा वापर करुन तुम्ही रबर पुन्हा घट्ट करु शकता. यामुळं रबरमधून हवा बाहेर येणार नाही

वाफ बाहेर येण्यास अडचण

अनेकदा शिटीमध्ये एखादा अन्नपदार्थ अडकले असतील तर वाफ बाहेर येण्यास अडचण येते. त्यामुळं शिटी न होणे आणि शिटीतून पाणी बाहेर येणे यासारख्या घटना घडतात

कुकरची रबर रिंग

कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर तुम्ही कुकरची रबर रिंग १ तासासाठी फ्रिजरमध्ये ठेवा आणि नंतर तिचा वापर करा.

VIEW ALL

Read Next Story