शिळ्या डाळीपासून बनवा चटपटीत नाश्ता; 5 मिनिटात बनणारी सोपी रेसिपी

रात्रीची उरलेली डाळ सकाळी खाण्यास घरातले नाकं मुरडतात. अशावेळी या शिळ्या डाळीला थोडा ट्विस्ट देऊन तुम्ही भन्नाट रेसिपी बनवू शकता.

रात्रीच्या उरलेल्या डाळीपासून तुम्ही अगदी पाच मिनिटांत सकाळचा नाश्ता तयार करु शकता.

उरलेल्या डाळीपासून तुम्ही भजी बनवू शकता. त्यासाठी १ वाटी बेसन, उरलेली डाळ, चवीनुसार मीठ, १ टीस्पून लाल मिरची पावडर, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची हे सर्व साहित्य एकजीव करुन घ्या

भज्यांसाठी तयार केलेले हे बॅटर व्यवस्थीत एकजीव करुन घ्या. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा.

तेल चांगले गरम करुन त्यात बॅटरचा गोल गोल शेप देऊन ते तेलात सोडा. हलका सोनेरी रंग येईपर्यंत भज्या तळून घ्या.

आता तुमचे दाल पकोडा तयार आहे. हिरव्या चटणीसोबत किंवा टॉमेटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story