दही बिघडलं, आंबट झालं; फेकू नका या पद्धतीने कमी करा आंबटपणा

घरी लावलेले दही किंवा विकत आणलेले दही जास्त काळ ठेवले की बिघडतं किंवा चवीला आंबट लागते.

Mansi kshirsagar
Sep 06,2023


दह्यातील आंबटपणा वाढला की आपण ते फेकून देतो. पण या काही टिप्स वापरून तुम्ही आबंट झालेले दहीही पुन्हा वापरू शकता.


दह्यातील आबंटपणा कमी करण्यासाठी तुम्हाला थोड्या दुधाची गरज भासणार आहे


आंबट झालेले दही एका वाटीत किंवा काचेच्या भांड्यात घ्या. त्यात दह्याच्या दीडपट कोमट दूध टाका.


दिलेल्या मापाप्रमाणेच दूध घ्या अन्यथा दह्याचा आंबटपणा कमी होणार नाही. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी दह्यातील आंबटपणा कमी होईल


दही आंबट झाले असेल तर त्यातील पाणी सगळ्यात आधी काढून टाका. त्यानंतर यात थंड पाणी टाकून हळहळू हे मिश्रण ढवळा. त्यानंतर गाळणीतून हे पाणी गाळून घ्या.


दही जास्त आबंट झाल्यास त्यात किंचित मीठ किंवा साखर टाकून खाल्ल्यास आंबटपणा येत नाही


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story