वजन कमी करण्यासाठी अन्न सोडू नका, माधुरी दीक्षितच्या पतीने सांगितला फंडा

Feb 01,2024

माधुरी दिक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने सोशल मीडियावर सक्रीय असून आरोग्य आणि डाएटसंबंधी सल्ले देत असतात.

काही दिवसांपूर्वी त्यांनी वजमी करण्यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता.

'फिटनेस म्हणजे फक्त चांगलं दिसणं नाही, तर असं शरीर तयार करणं ज्याला पुढे काही समस्या होणार नाहीत,' असं त्यांनी सांगितलं.

'वजन कमी करण्यासाठी मार्केटमधील अनेक डाएट प्रसिद्ध आहेत. दीर्घ काळात हे डाएट उपयोगी ठरत नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा'

'अनेक लोक वजन कमी करण्यासाठी कार्ब खाणं पूर्णपणे बंद करतात. पण कार्बचं सेवन पूर्ण बंद केल्याने शरिरात ऊर्जा राहत नाही आणि अशक्तपणा जाणवतो'

'जर एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर त्याने खाणं-पिणं सोडण्याची गरज नाही. याउलट तुम्ही कॅलरी तपासून बटर असणारं अन्न खाऊ शकता'

'कधीही शॉर्ट टर्म ध्येय ठेवू नका, म्हणजे 30 दिवसांत 10 किलो वजन कमी करणं. जर तुम्ही दीर्घकाळासाठी ध्येय ठेवत असाल तर डाएट फॉलो करण्यापासून रोखा'

'नेहमी आपल्याला भूक आहे त्यापेक्षा 200 ते 400 कॅलरी कमी खाल्ल्या पाहिजेत. यामुळे कॅलरी डेफिसिटमध्ये राहतील'

'तुम्ही प्रोटीन असणारे वेगवेगळे काजू खा. प्रवासात असताना तुम्ही शेंगदाणे सोबत ठेवू शकता'

VIEW ALL

Read Next Story