वयाची चाळीशी उलटल्यानंतर महिलांना केव्हाही मेनोपॉज होऊ शकतो. पण, त्या दरम्यानच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
ही एक अशी शारीरिक स्थिती असते जिथं महिलांची मासिक पाळी बंद होते. ज्यामुळं शरीरात असंख्य बदल होतात.
हार्मोनल बदलांमुळं अचानक वजन वाढू लागतं, त्यामुळं चिंता वाढवून घेऊ नका.
मेनोपॉज काळात शरीरातील उष्णता वाढू लागते. रात्रीच्या वेळी घाम येऊ लागतो.
बऱ्याचदा मेनोपॉजमध्ये मानसिक आरोग्यसंबंधित समस्या सतावू लागतात.
अनेकदा मेनोपॉजमध्ये मूड स्विंग्सही होतात. क्षणात एखाद्या गोष्टीवरून मन उडतं.
चाळीशी ओलांडल्यानंतर मेनोपॉज काळात महिलांची झोप कमी होते.
किमान कामं करूनही प्रचंड थकवा जाणवू लागतो. शरीर या लहानमोठ्या बदलांच्या माध्यमातून तुम्हाला वयाचा आकडा वाढत असल्याचं सूचित करत असतो. त्यामुळं या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.