Mind Diet

Mediterranean-DASH Diet Intervention for Neurodegenerative Delay हे या MIND डाएटचं संपूर्ण नाव. ज्यामुळं मेंदूचं आरोग्य सुदृढ राहतं.

मेंदूचे विकार दूर

मेंदूचं आरोग्य कायम चांगलं राहावं यासाठी त्यामध्ये अ्न्नधान्याचा समावेश करा. क्विनोआ, ओटमिल, ब्राऊन राईसच्या सेवनाचा मेंदूच्या विकासासठी फायदा होतो.

धान्य

धान्यपदार्थांच्या सेवनामुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. तर, अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

पालेभाज्या

पालक, केल आणि तत्सम पालेभाज्यांमुळं मधुमेह, हृदयरोग आणि स्थुलता नियंत्रणात राहते. शिवाय मेंदूही तल्लख होतो.

शेंगा आणि दाणे

अन्नपदार्थांमध्ये विविध शेंगा आणि दाण्यांचा वापरही मेंदूसाठी फायद्याचा ठरतो. कडधान्यांचाही संतुलित वापर केल्याच त्याचा मेंदूच्या आरोग्यास फायदा होतो.

बेरी आणि फळं

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, चेरी आणि ब्लॅकबेरी अशा बेरी किंवा तत्सम फळांचं दर दिवशी सेवन केल्यास मेंदूसाठी ही आरोग्यदायी बाब ठरते. अन्नपदार्थांमध्ये रिफाईन्ड तेलापेक्षा ऑलिव्ह ऑईलचा वापर अनेक आजारपणं दूर ठेवण्यात मदत करतं.

सुकामेवा

व्हिटामिन बी आणि ई चा स्त्रोत असणाऱ्या सुका मेवा आणि विविविध प्रकारच्या बियांचाही मेंदूच्या आरोग्यासाठी सुरेख फायदा होतो.

VIEW ALL

Read Next Story