पावसाळ्यात बऱ्याचवेळा संसर्ग आणि आजारांचा धोका असतो. हवामानातील चढ उतार आजारांना आमंत्रण करते.
तुम्हाला पण तुमचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर 'या' नैसर्गिक औषधी वनस्पतींचा समावेश नक्की करा.
तुळस ही आयुर्वेदामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तुळशीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते
स्वयंपाकघरात सहजपणे मिळणारी हळद ही औषधी वनस्पतीपैंकी एक मानली जाते. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
आल्यामधील औषधी गुणांमुळे आल्याचा उपयोग पारंपारिक औषधांमध्ये पिढ्यानपिढ्या केला जातो. आल्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत करतात.
लसूणमध्ये ॲलिसिन असते. जे रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
शरीरातील तणाव कमी करण्यासाठी अश्वगंधा, त्याच्या अनुकूलक गुणधर्मांसाठी ओळखली जाते.त्याचप्रमाणे अश्वगंधा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते .
बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)