हिवाळ्यात नेमकं किती वेळ मॉर्निंग वॉक करावं? तज्ज्ञ काय म्हणतायेत लक्षात ठेवा
थंडीच्या दिवसांमध्ये सपाटून भूक लागते आणि मग तसंच खाणंपिणंही होतं. अशा या दिवसांत वजन हमखास वाढतं. अशा वेळी हे वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी मॉर्निंग वॉकहून उत्तम पर्याय नाही.
हिवाळ्यात सकाळच्या वेळी चालण्यामुळं मेटाबॉलिझम आणि मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते.
चालण्याच्या सवयीमुळं हृदयाचं आरोग्य उत्तम राहून शरीराचं तापमानही नियंत्रणात ठेवणं शक्य होतं. शिवाय शरीरातील मांसपेशींनाही आराम मिळतो.
हिवाळ्यात चालण्याच्या सवयीमुळं रक्तदाब आणि शरीरातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. शिवाय तुमची त्वचाही चमकदार होते.
हिवाळ्यामध्ये मॉर्निंग वॉकसाठीचा योग्य वेळ असतो सकाळी 8:30 ते सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान. संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यानही तुम्ही वॉकला जाऊ शकता.
साधारण तासाभराचं चालणं शरीराला फायदेशीर ठरतं. त्यामुळं ही चालण्याची सवय नक्की अंगी बाणवा आणि त्याचे फायदे पाहा. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, कोणत्याही निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )