त्वचा आणि केसांसाठी कडुलिंब आहे वरदान

Nov 25,2023


आयुर्वेदात वनस्पतींना विशेष महत्व आहे.


अनेक मोठमोठ्या गंभीर आजारांवर उपचारासाठी अनेक फळं, फुलं,पानं उपयोगी ठरतात.


हळद,मध,ब्राम्ही,कडुलिंब यासारख्या औषधी वनस्पती अनेक आजारांवर अद्भुत औषध आहेत.


यातीलच कडुलिंब या औषधी वनस्पतीचं महत्व जाणून घेऊया


शारीरिक समस्या असो किंवा त्वचेच्या समस्या कडुलिंब या सर्व समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतो.


कडुलिंबाची फक्त पानचं नाहीत तर बिया आणि फुले सर्व औषधी आहेत.


कडुलिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असतं.


कडुलिंब चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, कोरडी त्वचा, सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.


कडुलिंबाच्या साबणाने आंघोळ करणाऱ्या लोकांची त्वचा मऊ आणि तरुण दिसते.


जर डायबिटीजचा त्रास असेल तर कडुलिंबाच्या फुलांची पावडर ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.


कडुलिंबाच्या फुलांमुले पचनसंस्था सुधारू शकते. ही फुलं बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.


कडुलिंबाच्या फुलांचा वास घेतल्यानं मळमळ कमी होते.

VIEW ALL

Read Next Story