Saturn Retrograde : 2024 मध्ये 'या' राशींवर असणार शनिदेवाची वक्रदृष्टी

Published by: Zee Team | Nov 25, 2023

वैदिक ज्योतिषशास्त्रात आणि कर्मदाता शनिदेव सर्वात महत्त्वाचा आहे. शनि देव कर्माचे फळ देतो. कर्मानुसार शनि शुभ आणि अशुभ फळं देतो. येणारं वर्ष 2024 मध्ये काही राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी असणार आहे.

Published by: Zee Team | Nov 25, 2023

जून 2024 मध्ये शनिदेव कुंभ राशीत उल्टी चाल चालणार आहे. शनिची उल्टी चाल काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.

Published by: Zee Team | Nov 25, 2023

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी शनि गोचर घातक ठरणार आहे. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा खर्च वाढणार आहे. नोकरीत विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Nov 25, 2023

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांवर नकारात्मक ठरणार आहे. नवीन वर्षात कोणतेही नवीन काम सुरु करु नका. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला नसणार आहे. तुम्हाला सर्व कामांमध्ये आव्बानांचा सामना करावा लागणार आहे.

Published by: Zee Team | Nov 25, 2023

मकर (Capricorn)

या राशींच्या लोकांसाठी नवीन वर्ष अशुभ ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास कमी होणार आहे. पैशाच्या व्यवहारात तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. आरोग्याची अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. क्रोधाने तुमचं नुकसान होणार आहे.

Published by: Zee Team | Nov 25, 2023

मीन (Pisces Zodiac)

शनि गोचरमुळे तुम्हाला कितीही मेहनत केली तरी तुम्हाला योग्य फळ मिळणार नाही. प्रत्येक कामात विनाकारण विलंब होणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा काम बिघडू शकतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Nov 25, 2023

VIEW ALL

Read Next Story