टोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?

पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.

पनीर आणि टोफू या दोन्हीमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्त्वे आढळतात पण, काही लोक पनीर आणि टोफूला एकच मानतात, तर हे दोन्ही एकमेकांपासून एकदम वेगवेगळे आहेत.

पनीर दुधापासून तर टोफू सोयापासून बनवले जातं या दोघांची चवही फारशी वेगळी असते. पनीर आणि टोफूमध्ये असणारे पोषक तत्वही वेगळे असतात.

पनीर हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे, त्यात सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असतात तर, टोफू हे सोयापासून बनवले जाते. टोफूमध्ये व्हिटॅमिन बी1 आणि एमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असते.

पनीरमध्ये लोहाचं प्रमाण अजिबात नसते, तर टोफूमध्ये हे प्रमाणं चांगलं असतं. टोफूमध्ये भरपूर सोया प्रोटीन असतं, जे किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करतं. हेच कारण आहे की ज्यांचं किडनी प्रत्यारोपण झालं आहे किंवा डायलिसिसवर आहेत अशा लोकांना टोफू खाण्याची शिफारस तज्ज्ञ करतात.

शाकाहारी लोकांसाठी पनीर आणि टोफू हे दोन्ही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. पनीर आणि टोफूमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त इतर पोषक घटक देखील आढळतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 321 कॅलरीज असतात, तर टोफूमध्ये 144 कॅलरीज असतात.

पनीरमध्ये फॅट जास्त असते, तर टोफूमध्ये फॅट कमी असते. त्यामुळे वजन कमी करू पाहणाऱ्यांनी पनीरऐवजी टोफूचे सेवन करावे. टोफूमध्ये कॉटेज चीजपेक्षा जास्त प्रथिने असतात.

पनीर आणि टोफू दोन्ही आरोग्यदायी असले तरी पनीरमध्ये कॅलरीज जास्त असतात. अशा परिस्थितीत वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी टोफू हा एक चांगला पर्याय आहे. वजन वाढवणारे पनीर चे सेवन करू शकतात.

VIEW ALL

Read Next Story