73 व्या वर्षीदेखील पंतप्रधान मोदी आपला फिटनेस आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देत असतात.
एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणाले होते की, 'मला शेवग्याचा पराठा खूप आवडतो.'
हा पराठा औषधी असून आठवड्यातून एक ते दोन वेळा खात असल्याचे ते म्हणाले.
वाढत्या वयासोबत फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर हा पराठा खाऊ शकता.
शेवग्याचा पराठा बनवण्यासाठी त्याची पाने तोडून स्वच्छ धुवा आणि बारीक चिरा.
गव्हाच्या पिठात शेवग्याची पाने हळद, जिरे मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून मिश्रण करा.
पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून चपातीप्रमाणे लाटा.
पराठ्याला दोन्ही बाजुने तूप लावून तव्यावर शेकवा.
टेस्टी आणि हेल्दी पराठा तयार होईल. हा पराठा तुम्हील सकाळी, संध्याकाळी नाश्त्यामध्ये खाऊ शकता.