कुरमुरे आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक? जाणूनच घ्या

Published by: Zee Team | Aug 21, 2024

सवयींचा भाग

कुरमुळे. भेळ, लाडू, चिवडा या आणि अशा अनेक रुपांमध्ये कुरमुरा आपल्या आहाराचा किंवा खाण्यापिण्याच्या सवयींचा भाग होतो. अशा या कुरमुऱ्याचे अनेक फायदे.

Published by: Zee Team | Aug 21, 2024

वजन कमी करण्याचा प्रयत्न

कुरमुऱ्यांमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम फायबरयुक्त स्नॅक आहे.

Published by: Zee Team | Aug 21, 2024

उर्जेचा पुरवठा

कुरमुऱ्यांमुळं शरीराला कमीत कमी वेळात उर्जेचा पुरवठा होऊन तो पचण्यासही हलका असतो. याच्या सेवनामुळं पोट भरलेलं राहतं.

Published by: Zee Team | Aug 21, 2024

अॅलर्जी

कुरमुऱ्यांमध्ये ग्लुटन नसल्यामुळं ज्यांना ग्लुटनची अॅलर्जी आहे अशा सर्वांसाठी हे खाद्य फायद्याचं.

Published by: Zee Team | Aug 21, 2024

कुरमुऱ्यांचे अनेक फायदे

कुरमुऱ्यांचे अनेक फायदे असले तरीही त्याचं अति सेवन मात्र हानिकारक ठरू शकतं. त्यामुळं कुरमुरेही प्रमाणात खाणं फायद्याचं.

Published by: Zee Team | Aug 21, 2024

(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 21, 2024

VIEW ALL

Read Next Story