उरलेले पीठ ठेवण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरताय? देताय आजारांना आमंत्रण

तेजश्री गायकवाड
Jan 08,2025


भारतीय घरांमध्ये चपाती किंवा भाकरी खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही.


वेगवगेळ्या पिठाच्या चपाती, पराठे आणि भाकरी बनवल्या जातात.


पण जर तुम्ही उरलेले पीठ मळून प्लास्टिकच्या डब्यात ठेवले तर तुम्ही मोठी चूक करत आहात.


ही सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते आणि अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.


प्लॅस्टिकची भांडी बनवण्यासाठी रसायने वापरली जातात जी हळूहळू पीठात विरघळतात.


या रसायनांमुळे तुम्हाला हार्मोनल समस्या असू शकतात आणि त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.


याशिवाय तुम्ही ॲल्युमिनियम फॉइल वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे.


फॉइलमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक अन्नामध्ये मिसळले जाते, ज्यामुळे तुमच्या किडनी आणि मेंदूला मोठे नुकसान होते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story