विमानात एकदा तरी बसावं असं अनेकांचं स्वप्न असतं. तुमच्यापैकी बहुतांशजण विमानात बसलेदेखील असतील.
पहिल्यांदाच विमानात बसणार असाल तर प्रवास तणावमुक्त, आरामदायी होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असायला हव्यात.
फ्लाइट पकडण्याच्या किती वेळ आधी विमानतळावर पोहोचायला पाहिजे? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
तुम्हाला याचे उत्तर माहिती नसेल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे.
डोमेस्टिक फ्लाइटच्या एका नियमानुसार तुम्हाला फ्लाइटच्या 2 तास आधी विमानतळावर पोहोचायला हवे.
येथे चेकइन करण्यासाठी किमान 20 ते 30 मिनिटांचा वेळ लागतो.
यानंतर सिक्योरिटी पॉइंटवरुन जावे लागते. येथे स्क्रिनिंगनंतर व्यक्तिगत चेकींग होते.
यानंतर संबंधित एअरलाइन्सच्या निर्देशांचे पालन करा.
अशाप्रकारे तुम्ही आपला प्रवास आरामदायी बनवू शकता.