गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र, हेच गाजर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
गाजर अतिशय पौष्टिक आहे. डोळे, यकृत, किडनी तसेच संपूर्ण शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.
ज्यांना रक्तदाब आणि मधुमेह समस्या आहे त्यांनी जास्त गाजर खाऊ नये.
ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांनी गाजराचे सेवन टाळावे.
गाजराचा पिवळा भाग गरम असतो. यामुळे याचे अधिक सेवन केल्यास पोटात उष्णता आणि घशात जळजळ होऊ शकते.
जास्त गाजर खाल्ल्याने दातदुखीची समस्या देखील निर्माण होवू शकते.
स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त प्रमाणात गाजर खाल्ल्यास दुधाची चव बदलू शकते.