टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी तीने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

धनश्री वर्मा ही उत्तम नृत्यांगणा आहे. तिच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पण आता ती गायिकासुद्धा बनणार आहे.

धनश्री वर्माने आपलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे. या गाण्याचं नाव परदेसी कॉलिंग असं आहे. गाणं रेकॉर्ड करतानाचा व्हिडिओ धनश्रीने शेअर केलाय.

धनश्रीच्या परदेशी कॉलिंग हे गाण्याचे म्यूझिक डायरेक्टर आणि कंपोझर सलीम मर्चेंट आहेत. त्यांनी चक दे इंडिया, फॅशन सारख्या हिट चित्रपटात गाणी दिली आहेत.

धनश्री वर्मा ही व्यवसायाने एक डेंटिस्ट आहे. यासोबतच ती उत्तम कोरिओग्राफरही आहेत. नुकतंच तीने झलक दिखला जा या कार्यक्रमातही भागी घेतला होता.

धनश्री वर्मा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असतात. आपल्या डान्सचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

धनश्रीचा पती युजवेंद्र चहल याने टीम इंडियात कमबॅक केलं असून टी20 वर्ल्ड कपसाठी तो न्यूयॉर्कमध्ये आहे.

VIEW ALL

Read Next Story