रात्री दिवे लावून झोपताय? होऊ शकतात 'हे' आजार

अनेकदा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्यासाठी किंवा कामासाठी खोलीचे दिवे चालू असतात. ही सवय जरी तुम्हाला सामान्य वाटत असली तरी अभ्यासात धक्कादायक बाब समोर आली आहे.

जून 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की रात्री दिवे लावून झोपणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापिठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार रात्रीच्या तेजस्वी प्रकाशाच्या संपर्कात राहणे मधुमेह होण्याची शक्यता वाढवते.

तसेच रात्री झोपताना मंद प्रकाशात झोपणे ज्येष्ठ नागरिकांमध्ये लठ्ठपणा आणि रक्तदाब यांसारखे आजार होऊ शकतात.

रात्रभर प्रकाशात झोपल्याने शरीरातील ग्लुकोज , हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित नियमन बिघडते.

संशोधनात असे आढळून आले की, रात्रीच्या प्रकाशात झोपणाऱ्या लोकांमध्ये इन्सुलिनला प्रतिरोध वाढतो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा देण्यासाठी रक्तातील ग्लुकोजचा वापर कमी होतो. यामुळे कालांतराने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

तसेच अभ्यासानुसार असे लक्षात आले की, रात्री लाईट लावून झोपल्याने डिप्रेशनचा धोका वाढू शकतो. मोबाईल मधून निघणाऱ्या निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story