ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुलं, गरोदर महिला, Ankylosing spondylitis, Parkinson अशा व्याधी असणारी मंडळी हे आसन करु शकतात.
तर, दीर्घकाळ उभं न राहता येणारी मंडळी, मायग्रेनचा त्रास, गुडघे अडकण्याचा त्रात आणि मकणक्याचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन टाळावं.
ताडासन करण्यासाठी दोन पायांमध्ये काहीसं अंतर ठेवून जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहा. आता दीर्घ श्वास घ्या आणि हात डोक्याच्या वर उचला.
दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा आणि तळवे आभाळाच्या दिशेला करा. श्वास सोडा आणि दंड कानांशेजारी येतील अशी हातांची रचना ठेवा.
आता एक Stretch द्या आणि एकाग्रतेनं एकाच ठिकाणी पाहत राहा. काही मिनिटं असं राहिल्यानंतर पुन्हा शरीर पूर्ववत करून स्नायूंना आराम द्या.
metabolism वाढवण्यासाठी ताडासनाचा फायदा होतो. शिवाय स्थूलतेमुळं उदभवणारे किडनीचे विकार, मधुमेह आणि हृदयरोगही यापासूनही बचाव करता येतो.
फुफ्फुसांचे विकार असणाऱ्यांसाठी हे आसन अतिशय फायद्याचं आहे. यामुळं श्वसनप्रक्रिया सुधारते.
शरीर आणि मन प्रसन्न करून सकारात्मकता देण्याचं काम हे आसन करतं. यामुळं एकाग्रतासुद्धा वाढते.
तणाव, नैराश्य आणि भीती या साऱ्यापासून मुक्तता मिळवण्याच्या प्रक्रियेत ताडासन बरीच मदत करतं. अनेकजण हे आसन आपआपल्या पद्धतीनं करतात. आणि भीती या साऱ्यापासून मुक्तता मिळवण्याच्या प्रक्रियेत ताडासन बरीच मदत करतं. अनेकजण हे आसन आपआपल्या पद्धतीनं करतात.
सततचा थकवा, अंगदुखी, पाठीचा त्रास असणाऱ्यांनाही ताडासनामुळं बराच आराम मिळतो. मग? कोणतीही अडचण नसल्यास तुम्ही हे आसन कधी करताय?