महिलांचे अश्रु हा पुरुषांचा वीक पाईंट ठरी शकतो. नविन संशोधनामुळे असे म्हणता येवू शकते.
महिलांच्या अश्रूंच्या वासामुळे पुरुषांचा राग शांत होवू शकतो अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
महिलांच्या अश्रूंना असलेल्या एका विशिष्ट गंधामुळे पुरुषांची आक्रमकता कमी होते असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
मानवी अश्रूंमध्ये एक केमिकल सिग्नल असतो, ज्यामुळे रागात असणाऱ्या व्यक्तीची आक्रमकता कमी होते. मेंदूमधल्या दोन भागांची क्रिया मंदावतो.
अश्रूंच्या वासामुळे टेस्टोस्टेरॉन कमी होतं. या बाबतचे संशोधन प्राण्यावर देखील करण्यात आले.
मादी उंदरांच्या अश्रूंमुळे नर उंदरांमधले वाद कमी झाल्याचे संशोधनात समोर आले.
इस्रायलमधल्या ‘वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतल्या संशोधकांनी याबाबत संशोधन केलं आहे.