तुम्हीसुद्धा 'हे' 5 पदार्थ खाताय तर आताच सावध व्हा; 100 च्या वेगाने वाढेल वाईट कोलेस्ट्रॉल

शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल सध्या सामान्य समस्या झाली आहे. त्याचबरोबर बदलती आहार पद्धतीसुद्धा याचं कारण बनत आहे. रक्तातील उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या उद्धवतात.

अशावेळी खाण्यापिण्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर हे पदार्थ तुमच्या आहारात सुद्धा रोज असतात तर तुम्हालासुद्धा गंभीर समस्यांना सामोरे जावं लागू शकत.

कोलेस्ट्रॉल ही रक्तातील चरबी असते जी शरीरासाठी आवश्यक आहे पण जास्त प्रमाणात असेल तर कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. यामुळे हृदविकाराचा धोका वाढतो.अशावेळी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणं गरजेचे असते.

यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतेक लोक नकळत दररोज हे 5 पदार्थ खातात जे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवतं. जाणून घेऊयात कोणते आहेत ते पदार्थ.

प्रक्रिया केलेले पदार्थ

आपण बऱ्याचवेळा प्रक्रिया केलेल्या पदर्थांच सेवन करत असतो. अशावेळी ट्रान्स फॅट एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्याव्यतिरिक्त हे कृत्रिम फॅट्स चांगले एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात. तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थांमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण अधिक असते.

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढते.प्रामुख्याने मांस, डेअरी प्रोडक्ट्स यांमुळे कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो.

अंड्यातील पिवळ बलक

प्रथिने सारख्या पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अंड हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. दररोज 2 पेक्षा जास्त अंड्यातीस पिवळ बलक खाल्ल्याने शरीरातील एलडीएल कोलोस्ट्रॉल वाढू शकते.

प्रक्रिया केलेली साखर

प्रक्रिया केलेली साखर एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. हे केवळ कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढवत नाहीत तर जळजळ देखील वाढवतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

तेल

स्वयंपाकघरात रोज वापरलं जाणरं तेलसुद्धा तुमच्या कोलेस्ट्रॉलवर परिणाम करू शकतं. अशावेळी सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सने भरलेले तेल टाळा आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल आणि अॅव्होकॅडो ऑइल यांचा वापर करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story