मधुमेहाच्या रूग्णांनी नेहमीच त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. विशेषत: गोड पदार्थ किंवा फळं खाण्यात.
काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. त्या साखरेचा देखील मधुमेहाच्या रूग्णांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पहा कोणती आहेत ती फळं.
केळ्यांमध्ये आढळाणारे घटक रक्तातील साखर त्वरित वाढवतात. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी केळी खाणं टाळावं.
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर आढळते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
अननसाचं सेवन करणं मधुमेहाच्या रूग्णांसाठी धोकादायत ठरू शकतं. याचं सेवन केल्याने वारंवार भूक लागते व वारंवार लघवीचा त्रास होऊ शकतो.
चिकू हे अतिशय गोड फळ आहे. जे मधुमेहाच्या रूग्णांनी खाऊ नये . (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)