पेनकिलर आणि अँटीबायोटीक्स ही औषधे किडनीवर विपरीत परीणाम करु लागतात त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त ही औषधे घेणे योग्य नाही.
मधुमेह, बीपी या समस्या आजकाल बहुतेक लोकांना जाणवतात. किडनीसाठी रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर वाढणे चांगले नाही.
युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन तसंच किडनी स्टोनचा त्रास झाल्याही किडनीचे आजार उद्भवू शकतात.
धूम्रपान केल्याने उच्च रक्तदाब आणि रक्तातील वाढलेली साखर या समस्या निर्माण होतात. या दोन्ही गोष्टींमुळे किडनीच्या आजार होऊ शकतात.
जास्त प्रमाणात मीठ खाणंही किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
योग्य पद्धतीने काम करण्यासाठी किडनीला पाण्याची आवश्यकता असते. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते