श्रीकृष्ण जन्माष्टमी

श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा दहया-दुधाने अभिषेक घालून पूजा केली जाते.

आरोग्यदायी फायदे

या पूजेचा प्रसाद सुद्धा सात्विक आणि रुचकर असतो. दही-पोहे, पंचामृत असा प्रसाद बाळकृष्णाला दाखवला जातो. पण चविसोबत पंचामृतचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर माग पाहूया पंचामृतचे आरोग्यदायी फायदे.

गर्भवतींसाठी फायदेशीर

पंचामृत म्हणजे एक गोड मिश्रण असते जे गरोदर स्त्रीला पोषक तत्व प्रदान करू शकते. हे बाळाच्या विकासात मदत करते. यामुळे आईच्या स्नायूंना मदत मिळते आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.

पचनक्रियेसाठी उपयुक्त

पंचामृत हे पचन तंत्राला मजबूत करते. ज्यामुळे अ‍ॅसिडीटी, पोटाच्या व आतड्यांच्या समस्या तसेच अल्सर पासून सुद्धा आराम मिळतो. ज्यांची पचनशक्ती काही कारणाने क्षीण झालेली असते अशांनी आवर्जून पंचामृत घ्यावे.

तरतरी येण्यास मदत

पंचामृत शरीराला ताकद देणाऱ्या सात उतींना पोषण देते ज्यात प्रजनन उती, दात, फॅटी टिश्यू, नार्व टिश्यू, मसल टिश्यू, प्लाझ्मा आणि रक्त पेशींचा समावेश होतो. त्यामुळे थकवा आला असेल किंवा अंगात ताकद नसेल तर नियमितपणे पंचामृत घ्यावे.

बुद्धी तल्लख होण्यास मदत

पंचामृताचे सेवन आपण मुख्यतः पूजेच्या वेळी करतो. पण पंचामृताचं सेवन नियमितपणे केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते. म्हणून गर्भवतींना आवर्जून पंचामृत दिले जाते, जेणेकरुन होणाऱ्या बाळाची बुद्दी तल्लख होईल.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

पंचामृत हे तुमच्या त्वचेसाठी एखाद्या क्लिंजरप्रमाणे काम करते. पंचामृताच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन सेल्सच्या विकासालाही मदत मिळते, त्यामुळे त्वचेवर आपोआपच ग्लो येतो. पंचामृत खाल्ल्याने केस निरोगी आणि चमकदार होतात. तसेच काही कारणाने केसांची वाढ खुंटली असेल तर ती सुरळीत होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story