हळदीमध्ये कर्क्यूमिन हे पोटाशी संबंधित समस्या वाढविण्यास कारणीभूत ठरवू शकते. त्यामुळे हळदीचं दूध जास्त प्रमाणात प्यायल्याने तुम्हाला जुलाब, मळमळ होऊ शकते.
जास्त प्रमाणात हळदीचं सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता कमी होते. ज्या लोकांना लोहाची कमतरता असेल त्यांनी हळदीचं दूध टाळावं.
गरोदरपणात हळदीचं दूध प्यायल्यास केल्याने गर्भाशयात पेटके, रक्तस्त्राव आणि वेदना होण्याची भीती असते. म्हणून गोल्डन मिल्कचे सेवन गरोदरपणात टाळले जाते.
यकृताशी संबंधित लोकांनी हळदीचं दूध पिऊ नये. यकृत व पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी हळदीचे दूध प्यायल्यास त्यांना पोट फुगणे, कमकुवत पचनसंस्था, अॅसिड रिफ्लक्स आणि अतिसारची समस्या होते.
हळदीचं जास्त सेवन केल्याने शरीरात एलर्जी होण्याची भीती असते. तुमच्या त्वचेवर पुरळ किंवा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
अॅनिमिया असलेल्या लोकांनी हळदीचं दूधाचं सेवन केल्यास शरीर आयर्नचे योग्य प्रकारे शोषण करण्यास अपयशी ठरतं. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढत नाही.
हळदीचं दूध किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी घातक आहे. हळदीमध्ये ऑक्सलेट असल्यामुळे किडनीचा आजार अधिक गंभीर होण्याची भीती असते.
हळदीमध्ये कर्क्यूमिन असल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी होते. त्यामुळे अशा लोकांचा त्रास आणखी वाढू शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)