बदाम हे निरोगी शरीरासाठी आणि मेंदूसाठी चांगलं मानले जाते. नियमित बदाम खाल्ल्यामुळे अनेक फायदा होतात. पण काही लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत. कारण यांच्यासाठी बदामाचं सेवन धोकादायक ठरु शकतं.
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या असेल त्या लोकांनी बदामाचं सेवन करु नये.
बदाममध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांनी बदाम खाऊ नयेत.
बदाममध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असल्याने Antibiotics औषधं घेणाऱ्यांनी बदामाचं सेवन करु नये.
बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ज्या व्यक्तींची पचनक्रिया कमजोर असेल त्यांनी बदाम खाणे टाळावे.
किडनी स्टोन किंवा पित्ताशयाची समस्या असल्यांनी कधीच चुकूनही बदामाचं सेवन करु नये.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी बदामाचं सेवन हानीकारक आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)